शाळांसाठी

dscn0130 h6 h3 11 14 5

 

उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे जगातील असे  भयावह आजार आहेत जे फार मोठ्या प्रमाणत मृत्यूला कारणीभूत ठरतात .

उच्च रक्तदाबाला “शांत खुणी  ”  असंही म्हटल जातं कारण याची  लक्षणं दिसून येत नाहीत मात्र , उच्च रक्तदाब , जर का

फार वर्षापासून असेल आणि त्याचे योग्य उपचार नाही केले तर हार्ट अटॅक , अर्धांगवायू , किडनी चे आजार , अचानक

मृत्यू  हे सगळं होऊ शकतं .

आपल्यासारख्या ग्रामीण भागात  याची जागरूकता फार कमी आहे. 

रक्तदाब (BP ) वेळोवेळी मोजणे आणि  त्यावर वेळीच उपचार  करणे महत्वाचे असते 

 

 

जर समजा  आपण लहान वयापासूनच  आपल्यामधे  रक्तदाब तपासून  घ्यायची सवय लाऊन घेतली तर ?

 

आपण मोठे झाल्यावर त्याचं महत्व ध्यानात येऊन त्यावर जागरूकता येईल  ना ?

 

आणि असं झालं  तर कदाचित  उच्च  राक्त्दाबामुळे  होणाऱ्या जीवघेण्या आजारांपासून वाचू ना ?

 

हो नक्कीच !! 

 

आपण आपल्या मुलांना , विशेषत ः शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचं शिक्षण दिलं तर ?

 

बरीच संशोधनं असं दाखवतात  की जर लहापना पासून या आजारांविषयी जागरूकता दिली तर आपण भविष्यात होणारे  दुष्परिणाम टाळू शकतो आणि हार्ट अटॅक , अर्धांगवायू , किडनी फेल , अचानक मृत्यू याचं प्रमाण खूप कमी करू शकतो .

 

 आम्हाला आणि  बऱ्याच संशोधकांना असं वाटत कि जर आपण शाळेतील मुलांना या विषयावर शिक्षण दिलं तर त्यांच्या आई वडिलांमधे  सुद्धा उच्च रक्तदाब , मधुमेह

 

यांना नियंत्रणात  आणण्यासाठी  मदत होईल , परिणामी आपण फक्त येणाऱ्या नाही तर  आजच्या  पिढीला सुद्धा  वाचवू शकतो . 

 

आमच्या  “School Health Program”  मधून आम्ही आपल्याला एक मोबाईल app देऊ आणि त्यासोबत एक BP

मोजण्याची मशीन देऊ . आपल्याला दर वर्षी  प्राथमिक शाळेतील  विद्यार्थ्याची उंची आणि वजन  मोजायचे  आहे आणि

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या मुलाचे रक्तदाब तपासायचे आहेत , वर्षातून एकदा !!

आपण केलेली तपासणी आमच्या कडे आमच्या सर्वर ला जमा होते .  आम्ही आपल्या शाळेला आमच्याकडे असलेले सगळे

रेकोर्ड पाठवून देऊ .

 

ज्या मुलांमध्ये उच्च रक्तदाब आहे असं जाणवेल त्यांच्या पुढच्या तपासण्या आम्ही करू तसेच जी  मुल स्थूल असतील त्यांच्या

 आम्ही मधुमेह आणि  उच्च रक्तदाब निदानसाठी  लागतील त्या तपासण्या करू .

आमचा हा प्रयत्न उच्च रक्तदाब असलेली मुल शोधण्यासाठी नाही , तर या मुलांमधे या आजारांविषयी जागरूकता तयार

करण्यासाठी आहे .

आम्ही आपल्या शाळेत दर तीन महिन्याला एक   छोटासा तास सुद्धा घेऊ .

आणि या सगळ्यासोबत  , आम्ही शाळेतील सगळ्या शिक्षकांची तपासणी करून उच्च रक्तदाब आणि मधुमेह याचं निदान

करून उपचार करू .

आम्ही मानतो, जर समाजात  कुठलाही चांगला बदल घडवून आणावयाचा असेल तर शिक्षकांशिवाय शक्य नाही , शिक्षक

अजूनही आपल्या समाजव्यवस्थेचा मूळ आधारस्तंभ आहेत .

 

(टीप :  आम्ही विनंती करतो जेव्हा केव्हा आपण  आपल्या शाळेत पालक मेळावा आयोजित कराल, आम्हाला जरूर कळवा, आम्ही तिथे येऊन  आपल्या  शाळेतील पाल्यांच्या  पालकांना संबोधित करू ) 

आमच्याशी संपर्क करा 

[powr-contact-form id=0639baef_1481874715101]