शाळांसाठी

dscn0130 h6 h3 11 14 5

 

उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे जगातील असे  भयावह आजार आहेत जे फार मोठ्या प्रमाणत मृत्यूला कारणीभूत ठरतात .

उच्च रक्तदाबाला “शांत खुणी  ”  असंही म्हटल जातं कारण याची  लक्षणं दिसून येत नाहीत मात्र , उच्च रक्तदाब , जर का

फार वर्षापासून असेल आणि त्याचे योग्य उपचार नाही केले तर हार्ट अटॅक , अर्धांगवायू , किडनी चे आजार , अचानक मृत्यू  हे सगळं होऊ शकतं .

आपल्यासारख्या ग्रामीण भागात  याची जागरूकता फार कमी आहे. 

रक्तदाब (BP ) वेळोवेळी मोजणे आणि  त्यावर वेळीच उपचार  करणे महत्वाचे असते 

 

 

जर समजा  आपण लहान वयापासूनच  आपल्यामधे  रक्तदाब तपासून  घ्यायची सवय लाऊन घेतली तर ?

 

आपण मोठे झाल्यावर त्याचं महत्व ध्यानात येऊन त्यावर जागरूकता येईल  ना ?

 

आणि असं झालं  तर कदाचित  उच्च  राक्त्दाबामुळे  होणाऱ्या जीवघेण्या आजारांपासून वाचू ना ?

 

हो नक्कीच !! 

 

आपण आपल्या मुलांना , विशेषत ः शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचं शिक्षण दिलं तर ?

 

बरीच संशोधनं असं दाखवतात  की जर लहापना पासून या आजारांविषयी जागरूकता दिली तर आपण भविष्यात होणारे  दुष्परिणाम टाळू शकतो आणि हार्ट अटॅक , अर्धांगवायू , किडनी फेल , अचानक मृत्यू याचं प्रमाण खूप कमी करू शकतो .

 

 आम्हाला आणि  बऱ्याच संशोधकांना असं वाटत कि जर आपण शाळेतील मुलांना या विषयावर शिक्षण दिलं तर त्यांच्या आई वडिलांमधे  सुद्धा उच्च रक्तदाब , मधुमेह   यांना नियंत्रणात  आणण्यासाठी  मदत होईल , परिणामी आपण फक्त येणाऱ्या नाही तर  आजच्या  पिढीला सुद्धा  वाचवू शकतो . 

 

आमच्या  “School Health Program”  मधून आम्ही . आपल्या  प्राथमिक शाळेतील  विद्यार्थ्याची उंची

आणि वजन  मोजायचे  आहे आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या

मुलाचे रक्तदाब तपासायचे आहेत , वर्षातून एकदा !!

 

ज्या मुलांमध्ये उच्च रक्तदाब आहे असं जाणवेल त्यांच्या पुढच्या तपासण्या आम्ही करू तसेच जी  मुल

स्थूल असतील त्यांच्या आम्ही मधुमेह आणि  उच्च रक्तदाब निदानसाठी  लागतील त्या तपासण्या करू .

आमचा हा प्रयत्न उच्च रक्तदाब असलेली मुल शोधण्यासाठी नाही , तर या मुलांमधे या आजारांविषयी

जागरूकता तयार करण्यासाठी आहे .

आम्ही आपल्या शाळेत दर तीन महिन्याला एक   छोटासा तास सुद्धा घेऊ .

आणि या सगळ्यासोबत  , आम्ही शाळेतील सगळ्या शिक्षकांची तपासणी करून उच्च रक्तदाब आणि

मधुमेह याचं निदान करून उपचार करू .

आम्ही मानतो, जर समाजात  कुठलाही चांगला बदल घडवून आणावयाचा असेल तर ते 

शिक्षकांशिवाय शक्य नाही ,

शिक्षक  अजूनही आपल्या समाजव्यवस्थेचा मूळ आधारस्तंभ आहेत .

 

(टीप :  आम्ही विनंती करतो जेव्हा केव्हा आपण  आपल्या शाळेत पालक मेळावा आयोजित कराल, आम्हाला जरूर कळवा, आम्ही तिथे येऊन  आपल्या  शाळेतील पाल्यांच्या  पालकांना संबोधित करू ) 

आमच्याशी संपर्क करा 

[powr-contact-form id=0639baef_1481874715101]