उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब याला शांत खुनी असं म्हटल जातं . उच्च रक्तदाब , मधुमेह यांना नियंत्रित ठेवण फार आवश्यक आहे नाहीतर हे विकार हार्ट अटक , अर्धांगवायू , मुत्र पिंड निकामी होणा किंवा अचानक मृत्यू सुद्धा येऊ शकतो . यांना जर वेळोवेळी औषध घेऊन नियंत्रित ठेवलं तर हे सगळ टाळता येऊ शकत .

रक्तदाब किंवा मधुमेह यापासून वाचण्याची गुरुकिल्ली म्हणजे 

जीवनशैली अशी वापरा की  ते होणार नाहीत ;

झाले तर जीवनशैलीत बदल करून त्याला नियंत्रणात ठेवा ;

असं नाही झाल तर औषधं चालू करा ;

औषधं चालू केल्यानंतर त्यांना वेळेवर आणि न चुकता घ्या .

वेळेवर, वेळोवेळी रक्तदाब तपासत रहा आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेत रहा 

लक्षात ठेवा , औषध चालू  असणाऱ्या ५० %  पेक्षा जास्त लोकांचा रक्तदाब नियंत्रित नसतो , तुम्ही त्यांच्यामध्ये नाही  ना ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *