आम्ही कोण आणि काय करतो ?

 

आम्ही  “रुरल हेल्थ प्रोग्रेस ट्रस्ट ” या संस्थेमार्फत ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्याकरिता कार्यरत आहोत.

आम्ही सरकारी आणि खाजगी संस्थामार्फत ग्रामीण भागात केल्या जाणाऱ्या  आरोग्य  सुविधेत मदत व्हावी म्हणून सहकार्य करतो .

आमच्या  वेगवेगळ्या कार्यक्रमातून ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याविषयी माहिती आणि सेवा पुरवतो.

उच्च रक्तदाब , मधुमेह , हार्ट  अटॅक , कर्करोग आणि मानसिक आरोग्य या आजारांवर रुरल हेल्थ प्रोग्रेस ट्रस्ट काम करते , यामध्ये ;

उच्च रक्तदाब

याचे  वेळेवर  निदान  होणे  आणि  योग्य  उपचार  होणे   नितांत   गरजेचे   आहे .   आम्ही    ग्रामीण   भागातील   लोकांना   निदान

आणि    उपचाराची   सोय   सहजरीत्या   उपलब्ध    करून   देतोय .   उच्च    रक्तदाब   झाल्यास   त्याचे   काय   काय    अपाय  

आहेत   याची बऱ्याच    लोकांना माहिती नसते.   आम्ही   हि   माहिती   लोकांना   पुरवण्याची    सोय   केली   आहे.    आम्ही   गावागत

आणि   लोकांपर्यंत   पोचून   त्यांना   बी  पी    तपासण्याची   सोय   उपलब्ध   करून   देतो .   ज्यांना    उच्च   रक्तदाबाचे   निदान

  होते   त्यांना   आम्ही   योग्य   उपचार   चालू   करण्याचा   सल्ला देतो   आणि   पाहिजे   तस   मार्गदर्शन   देतो .

मधुमेह 

याचे   वेळेवर    निदान   होणे   आणि   योग्य   उपचार   होणे    नितांत   गरजेचे   आहे .  आम्ही    ग्रामीण    भागातील    लोकांना

निदान   आणि    उपचाराची   सोय   सहजरीत्या   उपलब्ध    करून देतोय  .    मधुमेह     झाल्यास   त्याचे काय काय  अपाय आहेत

याची   बऱ्याच   लोकांना   माहिती नसते. आम्ही ही  माहिती   लोकांना   पुरवण्याची   सोय   केली   आहे.    आम्ही    गावागावात

   आणि लोकांपर्यंत    पोचून    त्यांना    शुगर    तपासण्याची   सोय   उपलब्ध   करून   देतो . ज्यांना   मधुमेहाचे    निदान   होते  

त्यांना   आम्ही    योग्य    उपचार    चालू    करण्याचा   सल्ला   देतो    आणि    पाहिजे   तस   मार्गदर्शन   देतो .

हार्ट अटॅक 

आजकाल  गावागावामधेही    हार्ट   अटॅकच   प्रमाण   खूप   वाढलेलं  आहे . छातीत   कळ  आल्यानंतर   त्याचे   लवकरात   लवकर

निदान   होणे   गरजेचे   असते . जर   छातीत    येणारी   कळ   हार्ट   अटक   असेल    तर    त्याला    लवकरात    लवकर  

प्रथोमपचार   आणि    योग्य    उपचार    होणे    नितांत    गरजेचे   असते .  आम्ही   हार्ट   अटॅक   निदानाची    सोय   आपल्या

दारापर्यंत   उपलब्ध    करून    देतोय. जर   आपल्याला   छातीत   कळ   येत   असेल ,   आपण     कुठेही   असा ,  घरी ,   शेतात ,

ऑफिसात ,   प्रवासात ,   अगदी   कुठेही ;  आम्हाला   एक    फोन    करा,  आम्ही    आपल्याजवळ    येऊन    आपल्याला    मदत

करू .  आमच्याकडे    आपण    असाल    तिथे    येऊन    छातीची   पट्टी   काढून ,   आपल्याला   असणारी   छातीतली   कळ   हार्ट

अटॅक   आहे    की   नाही   याचे   निदान   करण्याची   सोय   उपलब्ध  आहे.

 

सध्या आम्ही मुरुड , तेर , ढोकी , सारोळा , पळ्सप , उस्मानाबाद , कोंड , जागजी , आरणी , म्होतरवाडी , गुंफावाडी  ,

नायगाव , वाठवडा, पडोली  (लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा , महाराष्ट्र ) , बेहीआंग (चुर्चान्द्पूर जिल्हा , मणिपूर ) येथे काम करतोय .

 

.

“रुरल हेल्थ प्रोग्रेस ट्रस्ट”  चे    संस्थापक   डॉ  अरुण मोरे   काही   विद्यापिठांमार्फत   हार्टअटॅक ,  बी पी  , मधुमेह

यांच्या  निदानाच्या आणि उपचाराच्या सुविधा  ग्रामीण  भागात  कशा  पोचवल्या   जाऊ   शकतील   यावर

संशोधन करत आहेत .

 

 

अशाच उपक्रमातून त्यांनी , हार्ट अटक ची शक्यता वर्तवणारे “PredictRisk” मोबाईल app तयार केले आहे.

PredictRisk आपल्या मोबाईल मध्ये  डाउनलोड करण्यासठी इथे क्लिक करा

 

घरी बसून बी पी आणि शुगर चे उपचार करण्यासाठी आणि मार्गदर्शन

  BPMx atHome मोबाईल   app 

आपल्या मोबाईल मध्ये  डाउनलोड करण्यासठी इथे क्लिक करा  BPMx atHome

किंवा त्याचा या वेब साईट मधूनच वापरा